आजपासून ‘या’ भागात पाऊस नुसता धुमाकूळ घालणार; तर ‘या’ भागात अतिवृष्टी होणार Manikrao Khule Hawaman Andaj

Manikrao Khule Hawaman Andaj: मध्य व वायव्य बंगालच्या उपसागरादरम्यान स्पष्ट व ठळक आकारात रूपांतर झालेल्या हवेच्या कमी दाबाचे आज (शनिवार, २७ सप्टेंबर २०२५) सकाळपर्यंत तीव्र कमी दाबात रूपांतर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे (IMD पुणे, निवृत्त) यांनी दिली आहे. हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र चंद्रपूर, हिंगोली, पैठण, अहिल्यानगर (अहमदनगर) मार्गे मुंबईकडे मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून म्हणजे शनिवार, २७ सप्टेंबरपासून दसऱ्यापर्यंत (पुढील ५ दिवसांत) जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या क्षेत्रामुळे २७ ते ३० सप्टेंबर या काळात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.

आज सकाळीच सोन्याच्या भावात मोठी घसरण; आजचे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर पहा Gold Silver Price Today
आज सकाळीच सोन्याच्या भावात मोठी घसरण; आजचे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर पहा Gold Silver Price Today

या जिल्ह्यांमध्ये असेल अतिजोरदार पावसाचा धुमाकूळ (२७ ते ३० सप्टेंबर)

२७ ते ३० सप्टेंबर या काळात राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पाऊस जोर धरणार असला तरी, खालील जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे:

३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना करोडोंची संपत्ती, बक्कळ पैसाच पैसा; आठ 8 राशी यादी Ladki Bahin Yojana Update
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना करोडोंची संपत्ती, बक्कळ पैसाच पैसा; आठ 8 राशी यादी Ladki Bahin Yojana Update
  • शनिवार, २७ सप्टेंबर: मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा, तसेच धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.
  • रविवार, २८ सप्टेंबर: मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (छ. सं. नगर), पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा.
  • सोमवार व मंगळवार, २९ व ३० सप्टेंबर: मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा या भागांत जोरदार पाऊस राहील.

उघडीप आणि पूर विसर्गाचा धोका

या जोरदार पावसामुळे नद्यांतील धरणातून पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. पूर्णतः नव्हे, परंतु पावसापासून काहीशी उघडीप शुक्रवार, ३ ऑक्टोबर पासून जाणवण्याची शक्यता आहे.

बापरे!! सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, आताचे लाईव्ह बाजार भाव पहा Gold Silver Price Today
बापरे!! सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, आताचे लाईव्ह बाजार भाव पहा Gold Silver Price Today

Leave a Comment