‘हे’ 2 कागदपत्रे असतील तरचं लाडक्या बहिणींना २१०० रुपये महिना मिळणार; सरकारचा मोठा निर्णय Ladki Bahin Yojana Installment

Ladki Bahin Yojana Installment : महाराष्ट्रातील महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय योजना ठरलेल्या ‘लाडकी बहीण योजना’ संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महायुतीने या योजनेतील रक्कम ₹१,५०० वरून ₹२,१०० करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे, महिला लाभार्थींना आता ₹२,१०० कधीपासून मिळणार, याचे वेध लागले आहेत. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.

₹२,१०० च्या घोषणेवर सभागृहातील स्पष्टीकरण

आमदार अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या रकमेबद्दल स्पष्टीकरण दिले: राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी ₹२,१०० ची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यांनी सांगितले की, सरकार एखादी योजना जाहीर करते, तेव्हा जाहीरनामा हा ५ वर्षांचा असतो. अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, मात्र सध्या ₹२,१०० देण्याची कोणतीही घोषणा झालेली नाही. यामुळे लाडक्या बहिणींना ₹२,१०० मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्व पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा ₹१,५०० असा दोन महिन्यांचा हप्ता म्हणजेच ₹३,००० महिला दिनापूर्वी मिळणार आहे.

आज सकाळीच सोन्याच्या भावात मोठी घसरण; आजचे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर पहा Gold Silver Price Today
आज सकाळीच सोन्याच्या भावात मोठी घसरण; आजचे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर पहा Gold Silver Price Today

योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल नाही

आदिती तटकरे यांनी सभागृहात सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट असलेल्या निकषांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. संपूर्ण प्रक्रिया आणि कार्यवाही याच निकषांनुसार पार पडत आहे.

  • निरंतर छाननी: योजनेच्या अटी व शर्तीनुसार अर्जांची छाननी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
  • अपात्रता: जे लाभार्थी महिला निकषांची पूर्तता करत नाहीत, त्यांना योजनेचा आर्थिक लाभ न देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • सद्यस्थिती: योजनेंतर्गत २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज नोंदणी केली असून, त्यापैकी सद्यस्थितीत २ कोटी ५२ लाख महिला पात्र ठरत आहेत.

लाभार्थी संख्या नियमित बदलण्याचे कारण

योजनेच्या निकषांनुसार, लाडकी बहीण योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी लागू आहे. यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत नियमित बदल होत असतो:

३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना करोडोंची संपत्ती, बक्कळ पैसाच पैसा; आठ 8 राशी यादी Ladki Bahin Yojana Update
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना करोडोंची संपत्ती, बक्कळ पैसाच पैसा; आठ 8 राशी यादी Ladki Bahin Yojana Update
  • वयोमर्यादेमुळे बाद: सध्या सुमारे १.२० लाख महिलांनी वयोमर्यादा (६५ वर्षे) ओलांडल्यामुळे त्या योजनेतून बाद झाल्या आहेत. त्यामुळे दर महिन्याला वयाची ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ बंद होतो.
  • इतर राज्यांत स्थायिक: विवाहानंतर इतर राज्यांत स्थायिक झालेल्या महिलांचाही या योजनेंतर्गत विचार केला जात नाही.

1500 ऐवजी 2100 रुपये मिळण्यासाठी तुम्हाला 2 कागदपत्रे असणे आवश्यक आहे

  1. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा दाखला
  2. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे नाव रेशन कार्ड मध्ये असणे बंधनकारक

Leave a Comment