लाभार्थी महिलांना त्यांचे नाव योजनेच्या यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालील सोप्या स्टेप्सचा वापर करता येईल:
- अधिकृत वेबसाइटला भेट: सर्वात आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- अंतिम यादी सेक्शन: वेबसाइटवर गेल्यानंतर ‘अंतिम यादी’ (Final List) सेक्शनमध्ये क्लिक करा.
- माहिती भरा: तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड (Captcha Code) टाका.
- ओटीपी (OTP) प्रविष्ट करा: तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक वन टाईम पासवर्ड (OTP) येईल, तो योग्य ठिकाणी प्रविष्ट करा.
- यादी तपासा: त्यानंतर योजनेशी संबंधित अंतिम लाभार्थी यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल. या यादीत तुम्ही तुमचे नाव तपासून खात्री करू शकता.
यादीतून नावे वगळण्याची कारणे
सुरुवातीला योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, मात्र युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर योजनेच्या निकषांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. या बदलांमुळे अनेक महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत.
- सरकारी नोकरी: सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असा स्पष्ट नियम करण्यात आला आहे.
- पात्रता निकष: अनेक महिला अर्ज करताना योजनेच्या अन्य पात्रता निकषांमध्ये बसत नसल्यामुळे त्यांची नावे यादीतून वगळण्यात येत आहेत.
जर तुम्ही पात्रतेच्या निकषात बसत नसाल, तर तुमचे नाव आपोआपच लाभार्थी यादीतून वगळले गेले असण्याची शक्यता आहे. तुमच्या खात्यात हप्ता जमा न होण्याचे हेच मुख्य कारण असू शकते.