Typhoon Cyclone: गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच, आता हवामान विभागाने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे, पॅसिफिक महासागरात तयार झालेल्या ‘टायफून’ चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष परिणाम राज्यावर जाणवणार आहे.
‘टायफून’चा महाराष्ट्रावर नेमका काय परिणाम?
‘टायफून’ हे चक्रीवादळ थेट महाराष्ट्राला धडकणार नाही. मात्र, त्याचा प्रभाव अप्रत्यक्षपणे भारतीय मान्सूनवर होऊ शकतो. हवामान अभ्यासकांच्या मते, पॅसिफिक महासागरात तयार होणारी ही मान्सूनच्या प्रवाहावर परिणाम करतात, ज्यामुळे महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भासारख्या भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढू शकते.
राज्यातील पावसाचा पुढील अंदाज
बंगालच्या उपसागरावर २४ सप्टेंबर रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात २८ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहील.
- २२ ते २५ सप्टेंबर: राज्याच्या अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता आहे.
- २६ सप्टेंबर: या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व व दक्षिणेकडील भागांमध्ये दुपारनंतर पावसाची तीव्रता वाढेल.
- २७ सप्टेंबर: विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
- २८ सप्टेंबर: कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशात पावसाचा जोर कायम राहू शकतो.
शेतकरी आणि नागरिकांसाठी सूचना
हवामान खात्याच्या या अंदाजामुळे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या काळात शेतीत योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना कृषी विभागानेही दिल्या आहेत.